जेव्हा शिवनेरी किल्ल्यात तेजस्वी सूर्यकिरणे आली, त्या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630.
"आज उगवला सूर्य नभीचा
नव्या नवलाईचा
जसा हा इंद्र शोभतो
पुत्र जिजाऊचा"
शिवाजी हे नाव उलट अक्षराने वाचले तर ते जीवाशि तयार होते. ज्यांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याची निर्मीती केली तेच छत्रपती शिवाजी राजे होय.
स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणारे शिवाजी काशीद गुप्तहेर खात्यातील अधिकारी होते. ते नाभिक समाजातील होते. तसेच संभाजी कावजी हे लोहार समाजातील होते. शिवरायांच्या सैन्यात जास्तीत जास्त धनगर, माळी, महार, कुणबी होते. कुणबी म्हणजेच मराठा. म्हणूनच त्यांना म्हटले जाते 'दि ग्रेट मराठा.'
"आज उगवला सूर्य नभीचा
नव्या नवलाईचा
जसा हा इंद्र शोभतो
पुत्र जिजाऊचा"
शिवाजी हे नाव उलट अक्षराने वाचले तर ते जीवाशि तयार होते. ज्यांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याची निर्मीती केली तेच छत्रपती शिवाजी राजे होय.
स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणारे शिवाजी काशीद गुप्तहेर खात्यातील अधिकारी होते. ते नाभिक समाजातील होते. तसेच संभाजी कावजी हे लोहार समाजातील होते. शिवरायांच्या सैन्यात जास्तीत जास्त धनगर, माळी, महार, कुणबी होते. कुणबी म्हणजेच मराठा. म्हणूनच त्यांना म्हटले जाते 'दि ग्रेट मराठा.'
" रांजल्या गांजल्यांची मदत करणे हिच खरी इश्वरसेवा आहे " याच मनाच्या मांसाहेब होत्या. राजमाता जिजाऊंनी निर्माण केले, शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या मनात स्वराज्य निर्मीतीची जिद्द ; त्याच धैर्यमार्गाने मावळ्यांनी व शिवरायांनी पावले टाकली आणि एक यश उभारले ते म्हणजे ' स्वराज्य.' शिवरायांनी बलाढ्य आणि शक्तिमान शत्रू सुरवातातील केले नाही, आणि कमजोर शत्रू सोडले नाहीत.
असे अनेक शेकडो ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी बलिदान देऊन स्वराज्य देवतेला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून हा स्वातंत्र्याचा सूर्य महाराष्ट्रात दाखविला होता.
" स्वराज्य आणि स्वतंत्र्य
हे शेळ्या मेंढ्यांचे दूध
सांडून कदापी मिळत नसते
मावळ्यांनी स्वतःच्या
धर्मण्यातून
नसानसातून वाहणारे रक्त
जेव्हा मातृभूमीच्या
चरणावर वाहिले
तेव्हाच प्रसन्न झाली
होती स्वतंत्र्यदेवता
शांती आणि अहिंसा
युद्धातील एक बुजगावने असते
शिवरायांची युद्धनिती, आक्रमण, पराक्रम
भारतीय जेव्हा विसरले होते,
तेव्हाच मुघल या भारतात
स्थीर झाले होते ."
शहाजीराजे, संभाजीराजे, शिवाजीराजे यांची स्वप्ने उत्तुंग, व्यापक, उदात्त होती. ज्यांची स्वप्ने मोठी असतात, तीच माणसे मोठी असतात. राजाला मायेच्या डोहात नात्यांचा राजदंड फेकूण देणे फार महत्त्वाचे असते, कारण राजाला भावणेपेक्षा कर्तव्यच महत्त्वाचे असते. सापाला दूध पाजले तरी तो पाजणार्याला दंश करतो हा सापाचा गुणधर्म माणसांतसुद्धा असतो.
राजे नात्यांचा धाग्यात अडकले नाहीत ,
मायांच्या पाशांत गुंतले नाहीत,
जिव्हाळ्याचा कोशात अडकले नाहीत,
म्हणूनच राजे कधीच जाळ्यात अडकले नाहीत.
शिवराय म्हणजे एक स्थितप्रज्ञ, कर्तव्य आणि शिवराय म्हणजे शिवविचार याच शिवविचारांची ज्योत हृदयात तेवत ठेवायची असते.
राजगड राजियांचा !
प्रतापगड जिजाऊंचा !!
मातोश्री जिजाऊ मांसाहेबांना प्रतापगड फार आवडायचा. या प्रतापगडाखाली युद्धाची रुपरेखा, आराखडा जिजाऊंनी आणि शिवरायांनी स्वतः आखला होता. अखिल भारतात प्रतापगडाचे युद्ध गाजले होते कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध झाला होता.
नेताजी पालकर हे स्वराज्याचे सेनापती होते. त्यांना प्रतिशिवाजी म्हणून ओळखले जात होते. जगाच्या इतिहासातील एक दुर्मिळ युद्ध आहे. नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे ह्या शूर सैन्यांनी आणि शिवरायांनी आखून दिलेल्या व्यवहारसूचनेनुसार या युद्धात उतरले होते. शिवरायांनी आधुनिक नौदलाची आरमाराची उभारणी करताना जे विचार मांडले, त्या विचारांची आजही वर्तमानकाळात आवश्यकता आहे.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा इथला आर्थिक कणा आहे. आज शिवकाळातील शेतकर्यांची धोरणे वर्तमानकाळातील राजकारणी विसरतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात, कर्नाटकात, भारतदेशात जेवढे किल्ले, गड बांधले पण एकाही गडाला, किल्ल्याला शहाजीगड, संभाजीगड, शिवाजीगड असे नाव दिले का? मुळीच नाही. जी माणसे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, नावासाठी धडपडतात ती माणसे सहकार्याच्या नजरेतून, हे शिवरायांना जनतेच्या मनाचे मानसशास्त्र माहित होते.
शिवरायांच्या पदरी 40 टक्क्यांपेक्षा ही जास्त मुस्लिम सैनिक होते. शिवरायांचे भक्तिभावाने चित्र काढणारा चित्रकार- मीर महंमद यांनी काढलेली चित्रे आजही उपलब्ध आहेत.
' देवघरातील देव्हार्यासाठी
नव्हे तर मानवी हक्कांसाठी
शिवराय लढले.'
राजांची ही मोहीम देव्हारा जपण्यासाठी नव्हती तर मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी होती. आज वर्तमानकाळात मात्र न्यू ईअर, फ्रेंन्डशिप डे, व्हाईलेंटाईन डे हे दिवस व्यसनाच्या कोषात अडकत चालले आहेत. गावागावातीलत युवाशक्तींना माझी एक विनंती आहे की नवीन वर्षाचे स्वागत करताना एकच शुभेच्छा द्या -
" हॅप्पी न्यू ईअर !
नो गुटखा !
नो बिअर !
शेवटी रयत सुखी झाली आणि सुखाने जिवन जगू लागली.
अशा या राजाचा मृत्यू 30 एप्रिल 1680 रोजी झाला.
" राजांनी रयतेचे अश्रू पुसले,
रयत राजांसाठी रक्त सांडण्यासाठी सज्ज झाली,
राजांनी रयतेच्या स्वतंत्र्य, स्वाभिमानाचे बीज पेरले,
या स्वराज्य वृक्षाच्या बीज वृक्ष,
झाला तेव्हा रयतेचा स्वराज्य वृक्षाच्या छायेत
शिवरायांनी मायेच्या सावलीत निडध्या अंतःकरणाने
स्वाभिमानाने रयत जिवन जगली........."
3 एप्रिल 1680 रोजी पराक्रमी ज्ञानसूर्य छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणज्योत अस्ताला गेली. 50 वर्षांचे आयुष्य माणूस किती जगला, हे महत्त्वाचे नाही तर माणूस जीवनात कसा जगला हे महत्त्वाचे आहे. भोसले कुटुंबातील संभाजीराजे, शिवाजीराजे, राजाराम महाराजांना फार कमी आयुष्य लाभले. संभाजीराजे 32 वर्ष आणि राजाराम महाराजांना फक्त 30 वर्षांचा, इकडे मात्र दिल्लीचा शहाजहा औरंगजेब बादशहा हा मात्र 90 वर्षे जगला. कधी कधी मनाला एक स्पर्श करून जातो कि शिवराय जर 90 वर्षे जगले असते आणि औरंगजेब बादशहा जर 50 व्या वर्षीच संपला असता तर.......तर भारत एक महाशक्तीशाली राष्ट्र म्हणून विश्वात नावारुपाला आले असते, आणि भारतीयांच्या साम्राज्याचा सूर्य जगावरून मावळला नसता.
" बाँधकर पगडी हात में
समशेर लेकर,
जब छत्रपती शिवाजी राजे
घोडे पर सवार होते हैं,
तो दुुुश्मन भी कहते हैं
की काश हम महाराष्ट्र के होते हैं !!!"
जय हिंद....
SANGराम SALGAR
Good but please check you again some word
ReplyDeletewrong