Showing posts with label Nurse Day. Show all posts
Showing posts with label Nurse Day. Show all posts

Sunday, April 16, 2023

महासंग्राम समूहात झाला निराळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा

महासंग्राम समूहात झाला निराळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा



आज दिनांक १२ मे २०२१ म्हणजेच आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन . डॉक्टरांच्या बरोबरीने निस्वार्थपणे काम करणाऱ्या परिचरिकांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाचे औचित्य साधून "महासंग्राम" चे संस्थापक अध्यक्ष संग्राम सलगर ( INTERNATIONAL YOUTH LEADER ) तसेच आयोजक सुचेता भिसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनेक जेष्ठ आदरणीय व्यक्तिमत्त्व तसेच समूहाचे सदस्य उस्फूर्तपणे सहभागी होते. लॉकडाउन च्या काळात केलेला या निराळ्या उपक्रमाची सुरवात सकाळी ९ वाजता करण्यात आली.


कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पदी समिख्या स्वैन मॅडम (लेखिका, ASIA BOOK OF RECORDS), शुभांगी धनुर्धारी(M.A., NCC, लेखिका, MISS CONFIDENT 2020) , वर्षा वराडे फटकाळे (B.A., I.T.I., G.N.M., P.B.B.S.C., कवयित्री , लेखिका) या लाभल्या होत्या . कार्यक्रमाच्या आरंभी महासंग्राम चे संस्थापक संग्राम सलगर सर ( INTERNATIONAL YOUTH LEADER ) यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करून सर्वांना त्यांचा थोडक्यात परिचय करून दिला. 

कार्यक्रमाच्या सुरवातीला लॉकडाउनमध्ये परिचारिकांना आलेल्या अनुभवाविषयीचा लेख सुचेता भिसे यांनी दिला. यानंतर सध्याची चालू कोरोना परिस्थिती तील परिचारिकांचे महत्व आणि आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचा इतिहास ह्याविषयी समर्पक माहिती देण्याचे काम प्रमुख अतिथी शुभांगी धनुर्धारी मॅडम यांनी केले. या महामारीच्या काळात नर्सचे काम व त्यांची कामविषयीची श्रद्धा याविषयी काव्य आणि गद्य स्वरूपात आपले मत प्रमुख अतिथी वर्षा वराडे फटकाळे मॅडम यांनी केले. त्याचबरोबर समूहाच्या सदस्या श्रद्धा चोबे मॅडम यांनी नर्सेस च्या कामाबद्दल 'सेवा' या त्यांच्या काव्यरचनेतून कृतज्ञता व्यक्त केली.


अश्या पद्धतीने अनोख्या कार्यक्रमास ॲड. सुजितकुमार थिटे सर (संस्थापक अध्यक्ष- महाराष्ट्र पदवीधर संघटना) , ॲड. सिध्देश्वर काशिद सर (L.L.B.) , श्रद्धा चोबे मॅडम , रेखा बागुल मॅडम (B.COM) , अतार मुजबररहिमान गुलाबहुसेन सर (एम.ए.-हिंदी, ए.आय.एच.सी.&ए, बी.एड.) , सुरज देवकते सर ( व्हालीबाॅल खेळाडू) , धनराज गमरे सर, प्रतिक जाधव सर इत्यादी तसेच इतर सदस्य उपस्थित होते.

अश्या दिमाखदार आगळ्या वेगळ्या पद्धतीने 'महासंग्राम' समूहात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन थाटामाटात साजरा झाला. अखेरीस मा. संग्राम सलगर आणि सुचेता भिसे यांनी उपस्थित प्रमुख अतिथी व सदस्यांचे आभार मानून हा अनोखा सोहळा समाप्त झाला असे जाहीर केले

आझादी का अमृतमहोत्सव

"आझादी का अमृतमहोत्सव" म्हणजे भारताच्या स्वतंत्रतेच्या 75 व्या वर्षिकोत्सवाची स्मृतिमोहक आयोजना. या महोत्सवाच्या दरम्यान भारतीय स्...