Sunday, April 16, 2023

शिक्षक दिन

 सर्वप्रथम मी सर्व गुरूजनांना वंदन करतो.
" पुस्तकं प्रत्याधितं नाधीतं गुरू सन्निधो "
म्हणजेच कोणतीही विद्या एखाद्या योग्य गुरूपासून शिकली जाऊ शकते. जर का एखादी व्यक्ती फक्त पुस्तके वाचूनच जर स्वतःला विद्वान समजते तर ती स्वतःचा उद्धार करू शकत नाही.
आजकाल असं म्हणतात जिथे मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्यात, पण ज्यांचे नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, असे आपल्या संस्थेचे संस्थापक माननीय _________ आज जे काही त्यांच्या संस्थेत आहे ते फक्त त्यांच्या आत्मविश्वासामुळे, जिद्दीवर, बळावर आणि महान कार्यामुळे. तसेच आपल्या शाळेचे प्राचार्य ____________ . आजकाल आपण फक्त बाहेरच्याच लोकांना थोर समजतो, पण आपल्या शोळेत/ काॅलेजमध्ये थोर व्यक्ती नाहीत असे नाही. आपल्याला शिकवणारे आदरणीय गुरू सर्वात मोठे कार्य करतात कारण ते उद्याच्या तरूण पिढीसाठी हजारो योगीपुरूष/ युगपुरूष निर्माण करतात.
" ________________________" हे आपल्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. त्या ब्रीदवाक्याला अनुसरून सर्व आदरणीय शिक्षक आपल्याकडून परिश्रम करून घेतात. आपल्याला आपले शिक्षक सदैव सांगतात की परिश्रम, कष्ट करा पण शेवट पर्यंत.

 

" कोणतेही कार्य अडथळ्यापासून
पार पडत नाही.
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यांनाच यश प्राप्त होते. "
संपूर्ण भारतात असे समजले जाते की शिक्षकांएवढे प्रामाणिक कोण नाहीत ते कशावरून तर आपला भारत हा लोकशाही राष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्यात मतदान हे सर्वात मोठे आव्हान भारतापूढे, हे मोठे योगदान शिक्षकांच्या सहाय्याने पूर्ण केले जाते. अशा या प्रामाणिक शिक्षकांची नम्रता त्यांच्या चेहर्यावर दिसून येते.

" झाडे झुकतात,
फांद्या वाकतात,
फळे सांगतात,
विनम्रतेमुळे
शहानी माणसं नम्र असतात,
त्यांच्या चेहर्यावरून नम्रता
ओसांडून वाहत असते. "

' ग्रंथ हे गुरू ' आहेत हे खरेच आहे. पण ग्रंथातून फार अपेक्षा बाळगू नका. बेकन म्हणाला होता, पुस्तकात ज्ञान भरलेले असते, अभ्यासाने ते हस्तगत होत असते, पण ते ज्ञान कसे वापरायचे ते पुस्तकं शिकवत नाहीत तर ते ज्ञान कसे वापरायचे ते आपल्याला आपले गुरूच शिकवतात. काही शिक्षक आपल्याला फक्त पाठ्यपुस्तकातलेट पाठ नव्हे तर आपल्याला आयुष्याचे धडेही शिकवतात.

 

" The medicine teacher tells,
The good teacher explains,
The superior teacher demonstrates,
And The great teacher inspires. "

गुरू हे ब्रम्ह, विष्णू, महेश्वर, ते साक्षात परब्रह्म आहेत म्हणूनच
' गुरूर ब्रम्ह, गुरूर विष्णू,
गुरूर देवो महेश्वरा,
गुरूर साक्षात परब्रह्म,
तस्मेश्री गुरूवेन नमः '
असे संबोधले जाते.
एकदा एका शाळेत एक विद्यार्थी खूपच हुशार होता, तो प्रत्येक चाचणीमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवत असे पण एखदा तो चाचणीमध्ये नापास झाला. ह्या घटनेनंतर त्याने आपल्या आदरणीय गुरूला विचारले की गुरूजी मी का हरलो त्यावर त्याचे गुरूजी हसले आणि म्हणाले

' ऊन असो, या सावली,
काळोखी रात्र असो वा पाऊस,
कितीही वाईट परिस्थिती असो,
मी चालतच राहतो म्हणून मी जिंकतो,
तु सुद्धा माझ्यासोबत चल कधी हरणार नाहीस. '



आज जर का प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक नावाचा व्यक्तीच आला नसता तर सगळीकडे अशिक्षीतेचे वातावरण पसरले असते.
" आप जैसे गुरू
हमारे जिवन में न आते
तो हम यही ही
भटकते रह जाते "
आपले शिक्षक आपल्याला सदैव सत्याच्या मार्गाने चालायला शिकवतात जिथे आपण चुकतो तिथे आपल्याला शिक्षाही करतात.

" आपने ही सिखाया हमें
सही राह पर चलना
जान भी चल जाए
पर सच्चाई का साथ न छोडना !
अच्छे कार्य के लिए आपने
ही कहा शाब्बास
बूरे कामों का आपने ही
दिलाया एहसास !! "

गुरूभेट आणि गुरूकृपा ही फार महत्त्वाची आहे. समर्थ रामदास म्हणतात-
' म्हणे दास सायास त्याचे करावे !
जनी जाणता पाय त्याचे धरावे !
गुरू अंजनेवीन आकळेना !
जुने ठेवणे मी पणे आकळेना !! '
पाय म्हणजे केवळ चरण नव्हे तर पाय म्हणजे मार्ग होय. गुरू ज्या मार्गाने ईश्वरप्राप्तीपर्यंत जाऊन पोहोचले त्या पायाचे स्मरण करावे.
गुरू आपल्याला संस्कारचे धडे देतात. म्हणून आपण गुरूला शरण गेले पाहिजे.
 



" शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो.
शिक्षक हा केवळ एक पिढी नव्हे तर
त्या रूपाने भविष्यच घडवित असतात. "
आजच्या या शिक्षकदिनानिमीत्ताने आपल्या समाजावर ॠण व्यक्त करण्यासाठी आपल्या चरणी वंदन.
" अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे
गुरू देई संस्कारचे धडे
गुरूजनांचा एकच ध्यास
बालकांचा सर्वांगीण विकास
गुरूशिष्याचे अतूट नाते
ज्ञानाचा प्रकाश शाळा देते
ज्ञानाचा सागर गुरू
दररोज गुरूंना वंदन करू .."
खरोखरच मानवी जीवनात गुरू खूप महान आहे.

" आपके बिना हमसे न,
होगा अच्छा काम.
आप हमारे आदर्श,
आपसे न कोई महान. "

जय हिंद !!!!!
                                        SANGराम SALGAR

 


No comments:

Post a Comment

आझादी का अमृतमहोत्सव

"आझादी का अमृतमहोत्सव" म्हणजे भारताच्या स्वतंत्रतेच्या 75 व्या वर्षिकोत्सवाची स्मृतिमोहक आयोजना. या महोत्सवाच्या दरम्यान भारतीय स्...