*" महासंग्राम " समूहाचे संस्थापक संग्राम संतोष सलगर ( INTERNATIONAL YOUTH LEADER ) यांच्या मार्फत अनोख्या पद्धतीने "ऑनलाईन वृक्षारोपण" अनोखा संकल्प उपक्रमात सहभाग*
काल १ मे २०२१ रोजी पालघर जिल्ह्यात नांदगावला वृक्ष वाटणी करून सुवासिनींना हळदी कुंकू देऊन आरोग्य संदर्भात मार्गदर्शन व वृक्षारोपण जीवनावश्यक यावर आवाहन करून हा उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रेखा चंद्रकांत बागुल मॅडम होत्या. सौ. प्रेरणा ताई महाले सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. सन्मानीय माता सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हार लावून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवून मी सौ. रेखा बागुल सर्व महिलांना आरोग्यबाबत महिलांच्या तक्रारी व त्यावर काही उपाय सांगून मार्गदर्शन केले. नंतर कार्यक्रमाला लीना चौधरी यांनीही उपस्थिती दाखवून महिलांना गव्हर्मेंटच्या योजनेबाबत माहिती दिली. सौ. शर्मिलाताई यांनी महिलांना हळदी कुंकवाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर सर्व महिला छान छान उखाणे घेऊन कार्यक्रमात सहभागी झाल्या. सौ. रेखा बागुल यांनी निसर्गावर स्वरचित एक कविता सादर करून झाडांनी जर तुमचा कार्बन-डाय-ऑक्साईड घेण्यास नकार दिला तर ...अवघड होईल ...वेळीच सावध व्हा . झाडे लावा.. झाडे जगवा., तरच मुबलक ऑक्सिजन मिळेल. हे आव्हानही केले नंतर सर्व महिलांना हळदीकुंकू देऊन झेंडूचे रोपे दिले. आणि कार्यक्रमाची सांगता झाली....
*धन्यवाद* 🙏🌹💐
*प्रमुख अतिथी*
*सौ. रेखा चंद्रकांत बागुल*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
No comments:
Post a Comment