Sunday, April 16, 2023
Story of Pushpa
व्हेन यु लाॅस्ट युवर ऑटोबायोग्राफी
व्हेन यू लाॅस्ट युवर ऑटोबायोग्राफी
पुस्तकं ही ज्ञानाची भांडार असतात. आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यातून सर्वकाही शिकता येते, आचरणात आणता येते, फक्त वाचण्याची इच्छा जागृत झाली पाहिजे. आपण वाचन केल्यानंतर चांगल्या विचारांची टिप्पणी केली पाहिजे. आपल्या विचारात काही दोष आहेत का की नाही ते आतुरतेने जाणून घेतले पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर आपण आपल्या चांगल्या विचारांची जडणघडण दुसऱ्या चांगल्या मित्रांसमवेत, आपल्या जिवलग व्यक्तींसोबत केली पाहिजे. "पुस्तकात ज्ञान भरलेलं असतं ते अभ्यासाने वाचनाने हस्तगत होत असते " आपण त्या विचारांचे ग्रहण केले पाहिजे. पुस्तकं तुम्हाला खर्याअर्थी आयुष्य जगायला शिकवतात. म्हणायचंच झालं तर ते तुमचं जीवनच बदलून टाकतात. जे आपल्यासाठी अनमोल आहेत त्यांची आपण पूजा केली पाहिजे. प्रत्येक संस्कृतीही आपल्याला हेच सांगते. आपण वह्या पुस्तकांची पुजा फक्त दसऱ्याच्याच दिवशी करतो पण तसं न करता आपण त्यांना साधा नमस्कार तरी करावा. ह्या सर्व खटाटोपीने आपली पुस्तकांवरची श्रद्धा-भक्ती वाढते. ते आपल्याला हवीहवीशी वाटतात. आणि तीच पुस्तकं तुम्हाला अंधारातही दिवा होऊन मदत करतात.
शिर्षक वाचताच तुमच्या मनात खळबळ चालू झाली असेल. "ऑटोबायोग्राफी" म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्याबद्दल लिहिलेले चरित्र. लिहायला वयाची मर्यादा किंवा कोणतीच सीमारेखा नसते. ऑटोबायोग्राफी म्हणजे स्वतःचं स्वलिखीत आत्मचरित्र. आपण आपले अनुभव, आपले विचार, आपलं बालपण, तारुण्य आपली सुख-दुःखं, अडथळे निर्मळ मनाने लिखीत स्वरूपात रेखाटत असतो. आत्मचरित्रामध्ये आपण अनुभुवलेले प्रसंग, प्रसंगीक गोष्टी मांडत असतो. आपण जेव्हा स्वतःचं आत्मचरित्र लिहितो तेव्हा आपल्याजवळ आठवणींचा खजिना असतो, अनुभवांची डायरी असते, सुख-दुःखाचे क्षण असतात आणि डोळ्यात आनंदाश्रू.
" व्हेन यु लाॅस्ट युवर ऑटोबायोग्राफी " म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमचं आत्मचरित्र गहाळ करता तेव्हा. हे वाक्य जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्यालाही दुःख वाटते. मेहनतीची मथुरा पाण्यात जाण्यासारखी ही पण एका लेखकासाठी ही गोष्ट आहे. असंच माझ्याही आयुष्यात झालं. माझं सध्या वय एकोणवीस आहे. काहीदिवसांपूर्वी मी एका वयस्कर व्यक्तीशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केलता. त्यांना मी आत्मचरित्र लिहीत आहे असं सांगितले पण माझ्या संभाषणाला त्यांचा नकारार्थी प्रतिसाद/ प्रतिउत्तर मिळालं. त्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की आत्मचरित्र हे उतारवयी आयुष्यात लिहावं, थोडक्यात काय तर साठीच्या नंतर. पण माझ्या मते तसं नाही. कारण साठ-पासष्ठी मध्ये आपल्या शरीराचीही घसरण व्हायला लागते. शरीर आपल्याला साथ देत नाही. आपले जेवायचेही वांदे होऊन बसतात. आणि खरंतर माणसाचा क्षणभरायचाची विश्वास नाही. आजकाल वेगवान युगामुळे काहीजण तर पन्नाशीही गाठत नाहीत. ते ह्या जगाचा निरोप घेतात. उतारवयी आपल्याला जास्त काही आठवत नसते. जवळपास जास्तीत जास्त आठवणींचा आपण विचारही करत नाही. म्हणून आपण दैनंदिनी रुपी का होईना, आपल्या आठवणींचा सुख-दुःखांचा खजिना आपण जपला पाहिजे.
माझं लहानपणीच म्हणजे प्राथमिक शिक्षण हे माझ्या गावातच झाले. प्राथमिक शिक्षण हे आपल्या उच्चशिक्षणाचा पाया असतो. तो जर का भक्कम नसेल तर आयुष्याची इमारतच ढासळते. माझ्या प्राथमिक शिक्षकांचा माझ्या आयुष्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांचे ऋण हे न फिटणारे आहेत. त्यानंतर मी माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी जिल्हास्तरीय शाळेत प्रवेश मिळवला. माझी शाळा ही सैनिकी होती. जेव्हा खाकी सदरा अंगावर घालतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळीच धमक, वेगळीच ऊर्मी असते. आपल्याला स्वतःचा अभिमान वाटायला लागतो. शाळेला बर्यापैकी शुल्क भरावी लागत असल्याने परिस्थिती चटके देत होती. बिकट परिस्थितीमुळे जास्त खर्च किंधा हट्ट पुरवण्याचा प्रश्नच आला नाही. कारण, जन्मल्यापासूनचा अनुभव साथीला होता.
"गरीबीत जन्माला येणं ही चूक नाही,
पण,
गरिबीतच शेवटचा श्वास सोडणं म्हणजे चूक आहे "
आयुष्यात खूप मोठं बनायचा आहे, नाव कमवायचं आहे. अशी जिद्द, चिकाटी, विचार घेऊन मी खेड्यातला मुलगा त्या शाळेत शिकत होतो. त्या वेळेस मला वेगवेगळे वर्गमित्र भेटले. काहींनी साथ दिली तर काहीजणांनी आपला स्वार्थ साधला. वर्गमित्रांनी दिलेला त्रास म्हणजे आपल्यासाठी वाईट गोष्ट नसती. आपण नेहमीच त्याचा सकारात्मकपणे विचार करायचा असतो. मीही तेच केलं आणि स्वतःला पोलादासारखं भक्कम बनवलं. त्या शाळेतील शिक्षक म्हणजे ज्ञानाचा खजिनाच. त्यांचा माझ्या आयुष्यात अनमोल वाटा आहे. त्यांचा मी ऋणी आहे. त्यांनी मला मूर्तीप्रमाणे घडवले. कधीकाळी मूर्तीलाही घडवताना घाव सोसावे लागतात तसेच माझ्या आयुष्यातील खूप प्रसंग आले पण जवळपास सगळेच प्रसंग माझ्या हिताचेच होते. मी शालेय शिक्षण देत असताना मला वेगवेगळ्या परीक्षांचं वेढ लागलेले. मी खूप परीक्षा दिल्या. मला त्यातून खूप अनुभव मिळाले.
मी सातवीत असताना वायुदलातील शिक्षकांनी मला दैनंदिनी लिहिण्याचा कानमंत्र दिला. आणि आजही हा कानमंत्र मी काही गरजू लोकांपर्यंत पोहोचवत आहे. हा कानमंत्र म्हणजे आपणच रेखाटलेले आपल्या आयुष्याचं अनोखं सार. मला माझ्या सुख-दुःखात त्यांनी दिलेला हा दैनंदिनीचा कानमंत्र खूप कामी आला. खऱ्याअर्थी ह्या कानमंत्राने माझं आयुष्यच बदलले.
" परिस्थिती कितीही बिकट असो
त्या परिस्थितीशी
दोन हात करण्याची धमक
तुमच्यामध्ये पाहिजे "
त्यावेळेस मला दैनंदिनी लिहिण्यासाठी साधी वहीही नव्हती पण मी मात्र माझं काम करत होतो. काहीदिवस सातत्य आलच नाही. म्हणतात ना चांगल्या गोष्टी अस्तित्वात येण्यासाठी वेळ लागतो. अखेरीस एकदाच सातत्य आले त्यात पण सुधारणा म्हणजे मी दैनंदिनी तोडक्या-मोडक्या इंग्रजीत लिहीत असे. त्याने माझ्या आठवणीही राहिल्या आणि माझी इंग्रजी भाषाही सुधारू लागली.
मला चित्रपट पाहण्याची खूप आवड होती असंच एक चित्रपट पाहिल्यावर आपणही आपली खरी कहाणी लिहावी असं मनात आलं. " एक गोष्ट दोन वेळा तयार होते एक म्हणजे मनात आणि दुसरी अस्तित्वात " तसच माझ्या आयुष्यातही झालं. त्यावेळी मी आठवीत होतो मी पुस्तक लिहिण्याच्या तयारीला लागलो. सगळ्या आठवणींचा खजिना जमा करू लागलो. जसे मला सुचत गेलं तसतसं मी लिहित होतो. मान्य आहे की माझी शब्दसंपत्ती जास्त नव्हती. पण, मला एक नवीन यशाच्या दिशेची वाट सापडलेली आणि मी एक वाटसरू होतो. अनेक वेळी निराशा जेव्हा यायची तेव्हा माझं अर्धवट पुस्तकच मला प्रेरणा द्यायचं. मला लढण्यासाठी ताकद द्यायचं. मी त्या पुस्तकाला "महासंग्राम" हे नाव दिलेलं. ते माझ्यासाठी अत्यंत जवळचे आणि प्रिय होऊन कधी गेला कळालच नाही. मी माझे विचार, सुविचार तर खऱ्याआर्थी मी माझ्या आयुष्याबद्दल लिहित असत. ह्या पुस्तकाने मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.
मी दहावीत आमच्या शाळेतून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. आनंद गगनातही मावणारा नव्हता. दहावी झाल्यानंतर मी पुस्तकाचे पुन्हा काम सुरू केलं. कठोर परिश्रमामुळे मला विश्वप्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. विविध शिक्षक भेटले प्रत्येकांनी यशप्राप्तीचा कानमंत्र देऊन एक वेगळीच प्रेरणा दिली. काही मित्र-मैत्रिणींनीही दुःखात साथ दिली. काहींचे बोल तर मनाला भावले. मनात जागा करून राहिले. जसे की, " सूर्यालाही ग्रहण लागते मग आपण कोण आहोत? " प्रत्येक दिवशी एक नवीन दिशा मिळत होती. दैनंदिनी लिहिण्याचे काम तर चालूच होते. आता मात्र शब्द संपत्तीमध्ये भर पडत होती.
विश्वव्यापी कोरोना महामारीमुळे सर्व गोष्टी सोडून घराकडे परतावे लागले. मीही त्यातलाच एक होतो. वाटलं नव्हतं कोरोना इतके महिने माणसांमध्ये राहील. मीही पुन्हा लगेचच दहा-बारा दिवसात माघारी येईल असं समजून थोडंच साहित्य घेऊन घरी आलो. पण, कोरोनाचा वाढता प्रसार पाहून माघारी परतणे हे अशक्यच होते. आपले साहित्य व्यवस्थित असेल की नाही याची खात्रीही नव्हती. मुख्य म्हणजे त्या साहित्यामध्ये माझं आत्मचरित्र "महासंग्राम" हे होतं.
जवळपास आत्मचरित्र लिहून झालतं, पण प्रकाशित केलं नव्हतं. त्याचं कारण म्हणजे भक्कम असे यश आलेलं नव्हतं. खऱ्याअर्थी मी नववीत असताना माझे पुस्तक माझ्या वडिलांच्या हातून वाचण्यात गेलं. पहिल्यांदाच आम्ही दोघे पुण्याला माझी एन. एल. एस. टी. एस. इ. ( NLSTSE ) ची परीक्षा देण्यासाठी रवाना झालतो. परीक्षेच्या वेळी दप्तर बाहेर वडिलांजवळ देऊन गेलतो. अचानकच त्यांनी "महासंग्राम" वाचले. खर्याअर्थी त्याच वेळी पुस्तकाचे प्रकाशन घालते. त्यांना माझा अभिमानही वाटला. ते पुस्तक जास्त कोणाला माहित नव्हतं. सगळं काही गुप्त होतं.
कोरोना लाॅकडाऊन मध्ये कशाचाही न विचार करताना मी कविता, लेख, कथा, सुविचार लिहू लागलो. जवळपास 33+ पुस्तकांचा उपलेखक म्हणून लेखन केले. एक पुस्तक प्रसिद्ध लेखकांच्या सहाय्याने संग्रहित केले. तसेच दोन इंग्रजीत आणि एक मराठीत आंतरजालावर कवितासंग्रह प्रकाशित केले. जवळपास 500+ वरती डिजिटल प्रमाणपत्रे मिळाली. कित्येक लेख, कविता, कथा; इंग्रजी, मराठी तसेच हिंदीतून लिहिल्या. खूप लेखकांशी मैत्री झाली. दोन राज्यस्तरीय पुरस्कारही मिळाले; राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार आणि राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार हे एका संस्थेमार्फत मिळाले. आयुष्यात सगळ्या काही गोष्टी सुरळीत चालू होत्या. वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानही ग्रहण करत होतो. सगळ्यांचे मार्गदर्शनही मिळत होते. आता शब्दसंग्रहात खूप मोठी भर पडलेली.
जवळपास नऊ महिन्यानंतर विद्यालयात बारावीचे परीक्षासाठीचा प्रवेश भरण्यासाठी बोलावले होते. आनंदाला पारा नव्हता. 24 डिसेंबरला सकाळी सकाळी पुण्याला रवाना झालो. मित्रमैत्रिणींच्या भेटी झाल्या. प्रवेश भरण्यासाठी जरावेळ असल्याने मी माझ्या वस्तीगृहाकडे गेलो त्यांना आज माझं साहित्य घेऊन जाईल असे सांगितले. मी विद्यालयीन कामकाज उरकून पुन्हा वस्तीगृहाकडे साहित्य आणण्यासाठी गेलो. मी साहित्य ठेवलेल्या खोलीतकडे गेलो. आत जाताच एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. सर्वांचे साहित्य एकत्र ठेवलेलं. खोक्यांमध्ये साहित्य ठेवल्यामुळे लवकरच सापडेल अशी आशा होती पण तसं काही झालं नाही. सगळ्यांचे साहित्य विस्कटलेल्या अवस्थेत होतं. कोणाच्या पुस्तक, कपडे, दप्तर, इत्यादी सगळं हे न बघण्याच्याच परिस्थितीत दिसून येत होतं. दोन-तीन खोल्यांमध्ये शोध घेतल्यानंतर अखेरीस मला माझ्या साहित्याचा माघ लागला..मी साहित्य गोळा करत होतो पण, त्यातले खूप काही साहित्य सापडलच नाही. माझं आत्मचरित्र अदृश्यच होते. पहिल्यांदाच "महासंग्राम" न सापडल्यामुळे निराश झालो. निराशेनेच घरी माघारी परतलो.
निराशा ही कोणत्या व्यक्तीजवळ सांगावी अशी एखादा मित्र-मैत्रिणीही नव्हती. म्हणून, पुन्हा दैनंदिनीनेच साथ दिली. माझं पुस्तक गहाळ झालय हा सल आजही मनात आहे. पण, त्याच वेळी निश्चय केला की पुन्हा " महासंग्राम- एक ध्येय वेडा प्रवास " पुस्तकाची नवीन उभारणी करू.
आपल्याला निराशा, दुःख येते जेव्हा आपल्या अत्यंत प्रिय गोष्टी हरवताय. पण, आपण खचून न जाता, स्वतःलाच दिलासा देत पुन्हा उभारणी करण्याचा निश्चय केला पाहिजे. आणि आपलं जे संकल्पित आहे ते अखेरीस पूर्णत्वास घेऊन गेलं पाहिजे.
SANGRAM SANTOSH SALGAR
महासंग्राम मध्ये वैचारिक पद्धतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली.
दिनांक २६ मे २०२१ रोजी महासंग्राम द्वारे "वैचारिक बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली ."
महासंग्राम चे संस्थापक अध्यक्ष संग्राम संतोष सलगर [ INTERNATIONAL YOUTH LEADER ] तसेच आयोजक प्रितम चौरे यांनी वैचारिक बुद्ध पौर्णिमेचे आयोजन केले होते. कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ, आदरनीय, पूजनीय व्यक्तिमत्त्व तसेच समुहाचे सर्व सदस्य अगदी उत्स्फूर्तपणे सामिल झाले होते.
कार्यक्रमाच्या आरंभी "महासंग्राम" चे संस्थापक अध्यक्ष संग्राम सलगर सर तसेच प्रितम चौरे सर यांनी सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत केले व प्रमुख अतिथींचा अल्प परिचय करुन दिला. तसेच पूर्ण उपक्रमाची रूपरेखा व मार्गदर्शक तत्वे सांगीतली व उपक्रमास सुरुवात केली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संग्राम सलगर यांनी आजचा उपक्रम करण्या मागचा हेतू स्पष्ट केला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अशोक कांबळे [ B. COM, क्रांतीसूर्य महात्मा फुले पुस्तकार, SBI Worker, Mumbai ] आणि धनराज गमरे सर [ स्मृती राज्यस्तरीय पत्रभूषण पुरस्कार -२०२०, रायटर्स इंक अवॉर्ड -२०२१ ] यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख पाहुण्यांनी बुध्द पौर्णिमेबद्दल सखोल माहिती दिली. यावेळी बोलताना अशोक कांबळे सर म्हणाले " बुद्ध हे आचारात आणि विचारात असायला हवेत. " धनराज गमरे सर यांचंही मोलाचं मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात श्रीधर नंदीवाले सर, श्रध्दा चोबे मॅडम, आप्पासो शिंदे सर, स्वप्निल दाभाडे सर, उमेश गायकवाड सर, अर्पना माने मॅडम, अर्जुन जाधव सर, मंगेश कोळी सर ह्या सर्व प्रमुख उपस्थितींनी सहभागी होऊन सक्रिय सहभाग नोंदवावा. शेवटी अध्यक्ष संग्राम सलगर तसेच आयोजक प्रितम चौरे सर यांनी सर्व सदस्य, प्रमुख पाहुणे यांचे आभार मानून कार्यक्रमाल पूर्णविराम देऊन गौतम बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
celebrated organic farming in SRILANKA successfully
CELEBRATING ORGANIC FARMING-MAHASANGRAM SRILANKA
Celebrating Organic Farming Awareness Project by Mahasangram took to the heights of enthusiasm as we the SriLankan team began our research and discussion on organic farming under the guidance of Sangram, our head from India.
As the discussion began, was a sudden play (conversation) between members showing how SriLanka is famous for coco peat. This dialogue was a portrait of a agriculture company from Africa conversing with Srilankan farmer to obtain coco peat as a use for organic farming.
With this we began to study available research resources, share and arrive at conclusions regarding various aspects of organic farming.
Some main takeaways are;
“In an era where Sri Lanka is facing boundless health problems, moving forward an organic concept might be one solution for a healthy and sustainable future” (CKDu & Glyphosat Sri Lanka)
Organic farming helps in conserving the environment. It has very strong advocacy arm that fights for sustainable system of farming that tries to replicate nature as closely as possible.
Due the to the pandemic many farmers have adapted to organic agriculture and are practicing own methods of compost materials. The unavailability of chemical fertilisers and pesticides has driven this change.
Many programmes, projects such as Peace Winds America have supported SriLanka in educating farmers and training them to practice organic farming.
Challenges in organic farming: High cost, low yield.
Organic Farming in Srilanka.
Much of the agricultural sector of Sri Lanka has become dependent on agricultural chemicals. Fertilizers, pesticides, and growth regulators are widely used because of the increasing demand for food quantity, rather than quality, from a limited land area.
Some conclusions and judgements we arrived at;
Wit innovation developing at a rapid rate with the regeneration of the world, we see that agriculture has helped humans and been an essential aspect of humans survival. But with time and especially colonization impacts and with industrializaton the organic sense in farming has completely or partially wiped out and especially the youth has seen the impacts of it. Ignorance of organic agricultural methods and its main aspects contribution towards one’s immunity has portrayed immensely. Petiyage is a great example of youth farming leader. He portrayed to the society how does organic farming and its potential towards youth plays an impact on present life.
Medias should encourage public in consuming organic food, engaging in organic farming without presenting mere information and challenges of farmers if organic farming is practiced.
Governments should encourage and support individuals in implementing these organic agriculture practices gradually.
Organic farming and consumption is necessary to build up healthy lifestyle whilst conserving and protecting the earth too.
Further we were able to share about organic tea production in SriLanka as one of the most income generation source and production of healthy beverage. And also know about the vast organic farming in India.
This programme helped us explore, research and gain a vast knowledge on the subject. Hope this drives us for a cause of change by engaging in the smaller contribution steps to larger projects and programmes that aims in upgrading organic farming.
Special thanks SANGRAM SANTOSH SALGAR from INDIA for sharing much information and insights on this project.
Team SriLanka;
Jemima Uthayakumar
Hewage Gavindhu Kavisha Ambawatte
आगळ्या वेगळ्या वैचारिक पद्धतीने महासंग्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती थाटामाटात साजरी
आगळ्या वेगळ्या वैचारिक पद्धतीने महासंग्रामध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती थाटामाटात साजरी
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
आज दिनांक 14 मे 2021, धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती. जवळपास तीन-चारशे वर्षांचा कालावधी उलटून गेला, परंतु आजही ह्या भूमीवर, पूर्ण विश्वात स्वतंत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार करोडो ॠदयात तेवत आहेत. अशा जगप्रसिध्द, स्वाभिमानी राजाला मानाचा मुजरा. महासंग्राम ऑफिशीयल ग्रुप प्रस्तुत " वैचारिक संभाजी महाराज जयंती ". ह्या महामारीच्या काळात महासंग्राम मध्ये वैचारिक पद्धतीने शंभूराजे यांची जयंती साजरी करण्यात आली.
महासंग्राम चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संग्राम संतोष सलगर (INTERNATIONAL YOUTH LEADER, AYIMUN) यांचा हा आगळी वेगळी संकल्पना. कार्यक्रमाला सुरूवात ठीक सकाळी 09 वाजता झाली. सुरवातीला संस्थापक अध्यक्ष यांनी प्रमुख अतिथी यांचं स्वागत करून त्यांचा अल्पसा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी 1) मा. श्री. सुजय सुंदरराव देसाई [ लेखक- शंभूजागर (15 पुरस्कार, 5 देश, 6 राज्य), महाराष्ट्र बुक ऑफ रेकाॅर्ड, कवी, M.A. B.E.D. (हिंदी), M.A. B.E.D. (इतिहास), व्याख्याता, अध्यापक ] 2) शिवकन्या श्रद्धा शेट्ये
[ M.A. (इंग्रजी), पत्रकार, कवयित्री, लेखिका, प्राध्यापिका, कट्टर रणरागिणी ग्रुप- अध्यक्षा, High book of World Guinness Book of record ] हे लाभलेले.
ये खुद मौत का दावा था।
धरती को नाज था उसपर
ऐसा शेर शिवा का छावा था।
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुजय देसाई सर यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्यांनी सर्वप्रथम महाराजांचा जयजयकार करून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मुखपृष्ट सर्वांसमोर सादर केला. पुस्तकाचे नाव होते "शंभूजागर". ह्या पुस्तकाला देशातून, परदेशातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे.तसेच स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या मालीकेतील बहीर्जी नाईक यांच्याकडून देखील शुभेच्छा मिळालेला व्हिडीओ त्यांनी सादर केला. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या स्वलिखीत काव्य शंभूराज्यांच्या चरणी अर्पण केले. वेगवेगळ्या कविता, लेख सादर केले. तसेच प्रमुख अतिथी शिवकन्या श्रद्धा शेट्ये मॅडम यांनी अनेक आपल्या स्वलिखीत "शिवमयी विचारधारा" सादर केल्या. त्याचप्रमाणे वेगवेगळे प्रेरणादायी विचार, व्हिडिओ पाठवून मोलाचे मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमाच्या वेळी बरेच सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी सुहास खंडागळे सर, श्रध्दा चोबे मॅडम (अभियंत्रिका), शिवानंद रत्नपारखे सर, अंकीत नेवसे सर (F.Y.J.C.), मा. बाजीराव भुतेकर सर (निर्देशक शिक्षक, सैनिकी शाळा), धनराज गमरे सर(F.Y.J.C.), प्रितम चौरे सर(S.Y.J.C.), श्रीधर नंदीवाले सर(S.Y.J.C.), अतार मुजबररहिमान गुलाबहुसेन सर (M.A.), धिरज जोशी सर, प्रतिक जाधव सर(F.Y.J.C.), तानाजी शिंदे सर (शिक्षक), अजिंक्य सलगर सर(F.Y.B.COM) तसेच अनेक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अखेरीस अध्यक्ष संग्राम सलगर यांनी महाराजांची संपूर्ण माहीती सादर केली तसेच सर्व अतिथी, प्रमुख उपस्थिती तसेच सर्व सदस्य यांचे आभार मानून कार्यकमास पूर्णविराम दिला.
महासंग्राम समूहात झाला निराळ्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा
महासंग्राम " समूहात अनोख्या वैचारिक पद्धतीने मातृदिन यशस्वीपणे साजरा करण्यात आला
" महासंग्राम " समूहात अनोख्या वैचारिक पद्धतीने मातृदिन यशस्वीपणे साजरा करण्यात आला.
काल 09 मे 2021 हा दिवस मातृदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. आईसाठी छोटीशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी " महासंग्राम " चे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संग्राम संतोष सलगर ( आंतरराष्ट्रीय युवा प्रतिनिधी, भारत ) यांनी वैचारिक पद्धतीने मातृदिन हि मोहीम त्यांच्या समूहात राबविली. ह्या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ, आदरणीय, पूजनीय तसेच समुहाचे सदस्य देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 11 वाजता झाली. हा लाॅकडाऊनच्या काळात केलेला हा एक आगळावेगळा कार्यक्रम होता.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उत्तराखंडच्या साक्षी जैन मॅडम (कवयित्री, लेखिका), साहेबराव पवार सर (M.A. D.E.D.) तसेच सुचेता भिसे मॅडम म्हणून लाभलेले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रमुख अतिथींची स्वागत करून त्यांचा परिचय करून देण्यात आला. त्यावेळी धनराज गमरे सर यांनी परिचय करून देण्यात सुत्रसंचालकाला मदत केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच साक्षी मॅडम यांनी हिंदीतून काही चारोळ्या सादर केल्या. नंतर त्यांनी इंग्रजीतून आईसाठी कविता सादर केली. त्याच्या ह्या अनोख्या लेखनीस समुहातून खूप मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच धनराज गमरे सर यांनी पुन्हा एकदा शुभेच्छा देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
महासंग्राम चे संस्थापक यांनीही काही कविता आदर केल्या. कवितेचे बोल होते " खरच तीच असते आपली आई ". हळूहळू समुहातून आपले आपले विचार मांडण्यास सुरूवात केली. नंतर प्रमुख अतिथी सुचेता मॅडम यांनीही "आई" नावाची कविता सादर करून चालू परिस्थितीतले अस्तित्व मोजक्याच शब्दात पटवून दिले. तसेच डाॅ. शुभांगी गाडेगावकर मॅडम यांनी युट्युबच्या माध्यमातून कविता सादर केली. तसेच हिंदीतील शायर अत्तार सर यांनी कार्यक्रम मजेदार बनविण्यासाठी काही हिंदीतुन चारोळ्या सादर केल्या.
" लुकलुकत्या चांदण्यांचा
कैफ आज अंगणात
जाईल जरी कुठवरही
वंदनीय तीचे पाय
माझी माय, माझी माय "
शेवटचे प्रमुख अतिथी साहेबराव पवार सर यांनी विविध कविता आणि बरेच काही एक कृतज्ञता म्हणून सादर केले. ह्या कार्यक्रमाच्या वेळी विपुल गोसावी (राष्ट्रीय व्हालीबाॅल खेळाडू), श्रध्दा चोबे मॅडम, आशिष मेटकरी (राष्ट्रीय बाॅक्सींग खेळाडू), बाळू नांगरे सर, रेखा बागुल मॅडम (प्रसिद्ध लेखिका, शिक्षक), दिपाली मारोटकर (कवयित्री), सुहास खंडागळे, अथर्व धोत्रे, इत्यादी तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.
अशा अनोख्या वैचारिक पद्धतीने महासंग्राम समूहात मातृदिन साजरा झाला. अखेरीस मा. श्री. संग्राम सलगर यांनी सर्वांचे आभार माणून वैचारिक मातृदिन कार्यक्रम समाप्त झाला असे जाहीर केले.
महासंग्राम मध्ये परंपरेनुसार शिवजयंती साजरी
आज दिनांक १३ मे २०२१ म्हणजेच आपला जगप्रसिध्द, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (परंपरेनुसार). ज्यांच्यासाठी शब्दही कमी पडतील महती सांगायला अशा राजाची आज जयंती. या जयंती निमित्त आजच्या तरुणांना प्रेरणा मिळावी शिवविचार लोकांपर्यंत पोहचावेत, महाराजांचा गौरव व्हावा यासाठी व "शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरू नका" या वाक्याने प्रेरित होऊन, आजच्या दिनाचे औचित्य साधुन "महासंग्राम" चे संस्थापक अध्यक्ष संग्राम संतोष सलगर ( INTERNATIONAL YOUTH LEADER) व आयोजक प्रतिक जाधव यांनी या कार्यक्रममाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ, आदरनीय, पूजनीय व्यक्तिमहत्व तसेच समुहाचे सर्व सदस्य अगदी उत्साहाने सामिल झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पदी राजश्री मराठे ( हैदराबाद ) [ M. Pharamcy (Q.A.), लेखिका, कवयित्री ], अमरदीप पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब
[ वाणिज्य पदवीधर, संगणक अभियंता ( हार्डवेअर )], सुचेता भिसे [ B. PHARM, लेखिका ] असे गुणवंत, आदरणीय, वैचारिक, बहुरूपी व्यक्तिमहत्व लाभलेले होते. कार्यक्रमाच्या आरंभी "महासंग्राम" चे संस्थापक अध्यक्ष संग्राम सलगर सर यांनी सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत केले व त्या व्यतींचा अल्प परिचय करुन दिला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा. श्री. अमरदीप पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांचे सद्गुण ,इ. गोष्टिवर प्रकाश टाकला. सौ. राजश्री मराठे मॅडम ( हैदराबाद ) यांनी आजच्या तरुण पिढिने शिवविचार अंगी बाळगावे, तरच शिवजयंती सार्थकी लागेल आशी अपेक्षा व्यक्त केली व शिवजयंती दर्शनी करण्यापेक्षा शिवविचार अधिकाधिक प्रसारित करावे, समाजात जागृकता आणावी असा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला. तसेच अनेक कवितांमधुन त्यांनी शिवरायांचा गौराव केला. सुचेता भिसे मॅडम यांनी पारंपरिक शिवजयंती मागिल अप्रतिम स्पष्टिकरन व खुप उत्तम अशी उपयोगी माहिती सर्वांना दिली. तसेच शिवचरित्रतातुन आयुष्यात उपयोगी पडतील अशी ५ प्रेरक जीवन मुल्ये सांगीतली. त्याप्रमानेच समुहातील इतर सदस्यानी देखिल स्वलिखित कविता, चारोल्या, व्हिडिओ द्वारे शिवरायांना अभिवादन केले.
अश्या प्रकारे या अनाोख्या वैचारिक कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्रध्दा चोबे मॅडम (ENGINEERING), श्रीधर नंदीवाले सर, अतार मुजबररहिमान गुलाबहुसेन सर (M.A.), शिवानंद रत्नपारखे सर, धनराज गमरे सर, शुभांगी धनुर्धारी मॅडम (M.A.), विठ्ठल माने सर (Bsc.agri), सुहास खंडागळे सर, अजिंक्य सलगर सर (F.Y.B.COM), डॉ. दत्ता पडघान पाटील सर
( उप मुख्यध्यापक सैनिकी शाळा ), नामदेव घावटे सर, धिरज जोशी सर, इ. उपस्थित होते. अश्या रितीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने "महासंग्राम" समुहात शिवजयंती उत्स्फूर्तपणे साजरा करणयात आली.
अखेरीस अध्यक्ष संग्राम सलगर यांनी सर्व सदस्यांचे, अतिथींचे, पूजनीय, आदरणीय व्यक्तींचे आभार मानून तसेच त्यांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा देऊन कार्यक्रमास पूर्णविराम दिला.
महासंग्राम समुहामार्फत अनोख्या पद्धतीने ऑनलाईन वृक्षारोपण
महासंग्राम समुहामार्फत अनोख्या पद्धतीने ऑनलाईन वृक्षारोपण
ऑक्सीजनची कमतरता भासत चाललेली पाहून दिनांक 30 एप्रिल रोजी "महासंग्राम" समूहाचे स्थापक संग्राम संतोष सलगर ( INTERNATIONAL YOUTH LEADER ) ह्यांनी ऑनलाईन वृक्षारोपणाचा अनोखी उपक्रम त्यांच्या समूहाअंतर्गत राबविण्यात आला. हा उपक्रम तमाम जनतेमध्ये वृक्षारोपणाचा प्रचार करण्यासाठी होता. संग्राम संतोष सलगर यांनी केलेले निवेदन पुढीलप्रमाणे "आज दिनांक 30 एप्रिल रोजी "महासंग्राम" ग्रुप अंतर्गत एक अनोखा संकल्प करणार आहोत. कदाचित भविष्याच्या दृष्टीकोनातून हा आपल्या सर्वांच्या हिताचाच ठरू शकतो. आपल्या ग्रुपमध्ये खूप शिकलेले लोक आहेत, सर्वांचं सहकार्य लाभेल अशी आशा बाळगतो.
आजची परिस्थिती पाहता कोरोनाने पुन्हा तांडव घातलेला आहे. ऑक्सीजनची कमतरता भासत चाललेली आहे. आपण केलेल्या गैरकृतीची शिक्षा आपल्याला मिळालेली आहेच.
ह्या भूदलावर आपल्या समूहासारखे असे भरमसाठ असंख्य समूह आहेत. काही समूह स्वतःच उपक्रम राबवतात आणि स्वतःच प्रमाणपत्र देतात. त्यांचे विचार त्या ग्रुपपुरतेच मर्यादित राहतात. परंतु, महासंग्राम ग्रुप हा सर्वांच्या हक्काचा आहे. प्रतेकाच्या विचाराला ईथे किंमत आहे.
अनोखा संकल्प हा जरा अगळा-वेगळा आहे, थोडा कठीण आहे पण अशक्य नाही. आपल्या समूहात जवळपास ९० सदस्य आहेत. अजून काही जोडले जातील. असा संकल्प करायचा आहे की प्रत्येक सदस्याने कमीतकमी १० तरी झाडं लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण आपल्या घरामध्ये, परिसरात पण कोरोना विषाणूंचे पालन करून, सरकारच्या नियमांचे पालन करून लावायचे आहेत. जवळपास ९००+ झाडं आपण फक्त 2-3 दिवसात लावू शकतो. थोडं कठीण आहे पण अशक्य नाही. आता निसर्गासोबत स्वार्थी न बनता सारथी बनण्याची वेळ आलेली आहे.
जेवढं शक्य आहे तेवढी मदत करा. पर्यावरणाचा र्हास होण्याआधी आपण काही संकल्प करून, उपक्रम राबवून निसर्गाला मजबूत बनवायचं आहे. ह्या संकल्पाने नक्कीच आपल्याला भविष्यात फायदा होईल.
हा मेसेज इतरांपर्यंत पोहचवण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे.
आपण वृक्षारोपणाचे फोटो समूहात टाकू शकता कदाचित आपल्यामुळे दुसर्यांनाही प्रेरणा मिळेल.
हा अनोखा संकल्प पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे."
हा उपक्रम तब्बल तीन दिवस चालू असताना ह्या उपक्रमामध्ये दहावून अधिक अतिथी होते. ह्या उपक्रमासाठी सर्व अतिथींचं ऑनलाईनच मार्गदर्शन घेण्यात आलं. त्यातलेच काही अतिथी आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन खालीलप्रमाणे
1) ॲड. सुजितकुमार थिटे सर ( संस्थापक अध्यक्ष- महाराष्ट्र पदवीधर संघटना, नाळ फाऊंडेशन, महाराष्ट्र ) ह्यांनी त्यांच्या परीसरात झाडे लावून युवकांना प्रेरीत करण्याचं काम केलं आहे. सरांनी मोहीमेची सुरूवात समूहामध्ये त्यांनी केलेल्या कार्याची छायाचित्रे पाठवून केली.
2) ॲड. सिध्देश्वर काशिद सरांनी पर्यावरणाच आणि कायद्याबद्दल माहीती देवून निसर्गाप्रती आपली जबाबदारी किती मोठी आहे हे सांगून सर्वांना प्रेरित केले.
3) साहेबराव पवार सर (शिक्षक, नाशिक) यांनी अत्यंत सुंदर अश्या शब्दात त्यांचं मत मांडलं आहे.
" प्रथमत: संग्राम दादाचं अभिनंदन आणि कौतुक सुध्दा !
अभिनंदन यासाठी की आजा महामारीचा काळ चालू आहे . जे कोरोना पेशंट आहाेत त्यांना दवाखान्यामधील सक्त आॅक्सिजनची गरज आहे. ही दवाखान्यातील किती व्यक्ती असतील तर 135 कोटी लोकस्ख्येपैकी 5% लोक ऑक्सिजनसाठी तडफडताहेत.
मात्र
उर्वरित जी लोकसंख्या आहे त्यांना जर आॅक्सिजनची गरज भासली तर काय ?????
मात्र यावर संग्राम दादांनी सुचविल्याप्रमाणे आपण *एक झाड लावू मित्रा* या उक्ती प्रमाणे जर वृक्षारोपण झाले तर ऑक्सिजन साध्या माणसांनाच लागतं असं नाही . संपूर्ण जीवसृष्टी त्या ऑक्सिजनसाठी तडफडेल. यासाठी झाडंझुडूपं लावलीत तर निश्चितच निसर्गाचा समतोल ढासळणार नाही. आणि पर्यावरण वाचेल. माणसांसनवेत अनेक जीव जंतू जगतील.
कौतूक यासाठी की *मूर्ती लहान पण किर्ती महान* चांगल्याविचारांची संगत निश्चितच फायदेशीर ठरते. संग्राम दादांची कल्पना ही नावापुरतीच न राहता किंवा ते सांगताहेत म्हणून झाड लावायचं खरंतर तुम्ही जे समजायचं ते समजा . त्यांचा उद्देश एकच जीवसृष्टीला मुबलक प्राणवायू कसा मिळेल.
नाहीतर 135 कोटी लोकसंख्येतून शुन्य व्हायला काहीच वेळ लागणार नाही.
पुनश्च एकदा संग्राम दादांना शुभेच्छा !
अभिनंदन आणि कौतूक.
*झाडे लावू माझ्या बंधूभगिनींना देऊ प्राणवायू* "
4) आलीयागोहर मॅडम (शिक्षिका, धुळे) यांचंही मार्गदर्शन लाभलं. त्या म्हणतात खूप चांगला संकल्प आहे याबद्दल तुमचे मनापासून कौतुक. भविष्यात नक्कीच खूप हिताचा ठरेल. थोडं कठीण आहे पण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला काही हरकत नाही.
तुमच्या निस्वा:र्थी विचाराला सलाम
5) शिंदे सर (शिक्षक, सोलापूर) म्हणाले अतिशय छान कल्पना सुचली आहे...... हे सहज शक्य आहे याच्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाही मित्रांनो झाडे लावणे ही गोष्ट खूप सोपे आहे परंतु त्याचं संगोपन करणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपण बघतो प्रत्येक वर्षी बऱ्याच संघटना येतात झाडे लावतात आणि त्याकडे नंतर ते पाहत सुद्धा नाहीत ते झाडे आले कि नाही हे सुद्धा बघत नाहीत आपण झाडे लावण्याबरोबरच त्याच्या संगोपनाची सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे सर्वांना शुभेच्छा. झाडांचं संगोपन करण्यासाठी त्यांना सर्वांना आव्हान केले.
6) नंदकुमार सर म्हणतात अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. पर्यावरणाचे ढासळत चाललेले संतुलन व होणाऱा -हास पाहता प्रत्येकाने असा खारीचा वाटा उचलला तर नक्कीच याचा चांगला फायदा होऊन इतरही त्याचे अनुकरण करतील.
7) उमेश गायकवाड सर (शिक्षक) यांनी सर्वांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे ते म्हणतात, नक्कीच या समुहात बरेच बुद्धिजीवी, विज्ञानवादी लोक आहे हे मला माहिती आहे. त्याना मी मार्गदर्शन करण्यास सक्षम नाही किंबहुना ऐवढाही मोठा नाही पण कृतीतुन नक्कीच सांगु शकतो ऐवढा विश्वास आहे. आज ची परिस्थिती भयावह आहे. मी वृक्षारोपण कार्यक्रमा मध्ये विद्यार्थी नेहमी सांगायचं कि जगातील मानसांना पुरेल एवढे आँक्सीजन देनारी फँक्ट्री जगात कुठेच नाही ती फँक्ट्री म्हणजे आपली वृक्ष, जंगल आहे. ती वाचवली पाहीजे. हे माझे वाक्य आज ती सत्यात उतरलेले व प्रत्येक्षात पाहतो आहे. मी दोन वर्षा पुर्वी एक हजार झाडे विद्यार्थीना वाटली त्यातील 100 झाडे नक्कीच जगली व जगवली, फक्त सुरुवात करावी लागते स्वतःपासुन. तसे समुहातील प्रत्येकानी सुरवात केलीच आहे. आपण सुरु केलेल्या चांगल्या उपक्रमात मला सहभागी करुन घेवून मला अभीव्यक्त होता आले त्या बद्दल समुह प्रशासकाचे आभार व आपल्या सर्व वृक्षप्रेमीचे अभिनंदन
भविष्यात फुकटात भरपूर व मोफत आँक्सीजन, स्वच्छ हवा पाहिजे असेल तर प्रत्येकानी एक तरी झाड लावा व पुढच्या पिढीला निरोगी, सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करा. तसेच त्यांच्या छायाचित्रणातून सर्वजणच प्रेरित झाले.
8) अंकीत नेवसे (विद्यार्थी, सैनिकी शाळा, सोलापूर) ह्यानेही मोहीमेत सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यानेही ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. तो म्हणतो, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे संत तुकारामांनी म्हटले आहे. निसर्ग आपला सखा, सोबती आहे. जीवनात जर मित्र , सखा, सोबती नसेल तर त्या जीवनाला अर्थ तर काय राहणार आहे. वृक्ष नसतील तर मनुष्य प्राणी सुद्धा पृथ्वीतलावर अस्तित्व राहणार नाही. आपल्या घरातील प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक वृक्ष लावला पाहिजे. आपण महासंग्राम या ग्रुपच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये खारीचा वाटा उचलू यात. संग्रामनी जो विचार मांडलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आम्ही देखील फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन एकरामध्ये 1200 चंदन, 700 डाळिंब, 100 जांभूळ, नारळ, आंबा यांचे वृक्षारोपण केले आहे. जून मध्ये दोन एकरामध्ये झाडे लावण्याचा मानस आहे. ह्याचं वय जरी लहान असले तरी त्यांने निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
9) जनार्दन गोरे सर (कवी, औरंगाबाद) सांगतात आपला उपक्रम खूप छान आहे. वृक्षारोपण ही खरी काळाची गरज आहे ती आपण वृक्ष लागवड करून निसर्गाला अनोखी भेट देऊ शकतो. ज्याला शक्य होईल तेवढी झाडे लावली पाहिजे. जेणेकरून ऑक्सी जन कमतरता भासणार नाही. असे उपक्रम सतत राबविले गेले पाहिजे.
10) सागर चतुर सर (राज्यकर निरीक्षक) यांनी मोहीमेला सुरूवात करण्यासाठी मोलाचं काम केलं आहे.
11) गणेश आवताडे सरांनी छायाचित्रामार्फत युवकांना प्रेरीत करण्याचं काम केलं आहे.
तसेच परदेशातून इमरान फारूक (नायजेरीया) ह्यांनी देखील समूहात सहभाग घेतला आहे.
गेले तीन दिवस झाले जास्त प्रमाणात महासंग्राम समूहातील सदस्यांनी झाडे लावण्याचा प्रयत्न केला आहे. काहींनी छायाचित्रे पाठवून दुसर्यांना झाडे लावण्यासाठी प्रेरित केले आहे. काहींनी वृक्षारोपण प्रसारासाठी कवीता, लेख लिहेले आहेत. शेवटच्या दिवशी समुहाचे स्थापक संग्राम संतोष सलगर (INTERNATIONAL YOUTH LEADER) यांनी समुहाची संख्या पाहत 1500+ झाडांचा महासंग्राम समूहामार्फत संकल्प पुर्णत्त्वास घेवून जाण्यासाठी सर्वांना आवाहन तसेच शुभेच्छा दिल्या. मोहीमेचे आभार प्रदर्शन हे समुहाचे ॲडमीन श्रीधर नंदीवाले याने केले. त्यामध्ये त्याने म्हटले आहे, महासंग्राम ग्रुपच्या माध्यमातून आपण वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले. सर्वप्रथम उपक्रमाचे मुख्य संकल्पक संग्राम सलगर यांचे मी आभार मानतो. राबविलेले संकल्प पूर्ण करण्यास आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार. या उपक्रमाच्या माध्यमातून काही विचारवंत शिक्षक तसेच वकील या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचेही आभार. याच सोबत कवी, लेखक यांचेही मोलाचे सहकार्य मिळाल्याने त्यांचेही खूप खूप आभार. आपण सर्वांनी असेच सहकार्य केल्यास आम्ही असेच नवनवीन संकल्प समाज हितासाठी राबवत जाऊ. आपल्या सोबत काम करून खूप खूप आनंद झाला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.
अखेरीस हा कार्यक्रम संपला असे ग्रुप तर्फे जाहीर करण्यात आले.
खरच आपणही असे विविध उपक्रम राबवावेत. आपल्यावर भयंकर अशी वेळ आलेली आहे. आता आपण निसर्गाप्रती स्वार्थी न बनता सारथी बनलं पाहीजे.
आझादी का अमृतमहोत्सव
"आझादी का अमृतमहोत्सव" म्हणजे भारताच्या स्वतंत्रतेच्या 75 व्या वर्षिकोत्सवाची स्मृतिमोहक आयोजना. या महोत्सवाच्या दरम्यान भारतीय स्...
-
"आझादी का अमृतमहोत्सव" म्हणजे भारताच्या स्वतंत्रतेच्या 75 व्या वर्षिकोत्सवाची स्मृतिमोहक आयोजना. या महोत्सवाच्या दरम्यान भारतीय स्...
-
Hiii, Before 19 day's, first time in life I bought a dragonfruit. It was quite healthy. It has lots of benefits 1) Rich in vitamins 2)...
-
Oxygen cost Oxygen is not a natural gas; rather, it is a naturally occurring element that is essential for life. While oxygen is abundant in...